Friday, January 27, 2023

नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू; चंद्रकांत पाटलांचा टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केल्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंवर पलटवार करत त्यांचा उल्लेख “पप्पू” असा केला आहे. ते पुणे येथे बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले,  नाना पटोले (Nana Patole) हे राज्यातील पप्पू आहेत. केंद्रातही एक पप्पू आहेत. ते आपल्या मनाला येईल ते बोलत राहतात,’ असा खोचक टोला चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil)  यांनी केली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

नाना पटोले नेमकं काय म्हणाले होते –

केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही, तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. तसेच देश बरबाद करणाऱ्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला आहे असा आरोपही त्यांनी केला होता.