हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप मध्ये प्रचंड अस्वस्थता असून नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खडसेंनी निदान तिकडे गेल्यावर तरी खर बोलावं असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असं पाटील म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, संजय राऊत यांच्यावर मी काही बोलणार नाही. माझा दिवस कशाला खराब करता. त्यांनी पुण्यात 80 नाहीतर 280 जागा लढवाव्या, त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.