Sunday, June 4, 2023

शरद पवारांचा इतिहास खरं न बोलण्याचा; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सत्तास्थापनाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचा इतिहास का खर न बोलण्याचा आहे असं म्हणत ऑफर आली धावत जाण्याची तुमची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही थांबलात का ? असा प्रश्न त्यांनी केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मी सामान्य व्यक्ती असल्याने शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली मला माहित नाही. पण शरद पवार यांचा इतिहास पहिला तर खर न बोलण्याचा त्यांचा इतिहास आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आणि मोदींनी जर ऑफर दिली होती तर तुम्ही का थांबला ? तुमची तर धावत जाण्याची परंपरा आहे असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, नारायण राणे यांना नितेश राणे प्रकरणी आलेल्या नोटीसीबद्दल देखील त्यांनी भाष्य केले. नारायण राणे यांना नोटीस पाठवणं हा हस्यास्पद प्रकार आहे असे म्हणत नारायण राणे हे सर्वांना पुरून उरणारे आहेत अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.