अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी ; भाजपची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता शिवसेना नेते अनिल परब यांचीही चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी काहीजण सुपात आहेत तर काही जण जात्यात, असं म्हणत महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अनिल परब यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. अनिल परब यांच्यावरही अनिल देशमुखांइतकाच गंभीर आरोप आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ऑन पेपर त्यांच्यावर हा आरोप केला आहे.

याशिवाय, संजय घोडावत यांचीही केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेच्या पत्रात संजय घोडावत आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे. मला थेट अजित पवार यांचं नाव घ्यायचं नाही. केवळ अनिल परब आणि संजय घोडावत यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे,अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

Leave a Comment