सरळ सांगा की राऊतांशी चर्चा करून निर्णय घेणार ! लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : महाराष्ट्रातील करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता त्यावर नियंत्रणासाठी बैठका घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (2 एप्रिल ) जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन संबंधीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावरून विरोधी आक्रमक झाले आहेत. भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून म्हंटले आहे की,’ मुख्यमंत्री म्हणाले की पत्रकारांशी चर्चा करून लॉक डाऊन चा निर्णय घेऊ. अहो! सरळ सरळ सांगा ना की संजय राऊतांशी चर्चा करुन निर्णय घेणार! कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्राला… नियोजन शून्य… जबाबदारी शून्य…” अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

तुम्ही फक्त्त एकमेकांचे गोडवे गा

दरम्यान आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत टीका करणं सोपे आहे पण उद्धव ठाकरे होणे अवघड आहे. पत्नी रुग्णालयात मुलगा कोविड शी झगडतो आहे तरीही धीरोदत्तपणे हा महाराष्ट्र सांभाळतोय. स्वतःच्या ह्रुदयात स्टेन्स असताना देखील मुख्यमंत्री महाराष्ट्र सांभाळतायत त्यांना सलाम ‘ अशा स्वरूपाचे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. मात्र यावरून देखील चंद्रकांत पाटील यांनी ‘ तुम्ही फक्त एकमेकांचे गोडवे गा!’ असा टोला लगावला आहे.

दरम्यान पुण्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन संदर्भात ही बोलताना त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्याबाबत त्यांनी म्हटलं आहे की,’कोरोना नियंत्रणात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने पुण्यात लॉकडाउन जाहीर केला परंतु प्रश्न अजूनही तोच आहे… लॉक डाऊन मध्ये हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेचे काय होणार याचा विचार सरकारने केलाच नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment