Thursday, February 2, 2023

2024 च्या निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू – चंद्रकांत पाटील

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. जर सर्वांनी एकजूट दाखवली तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. ते इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा परमेश्वराने एक आशिर्वाद दिलाय. पण कार्यकर्ते बरोबर असतील 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. जर आपण आपल्यात एकजुट ठेवली असती तर ते या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण एकजुटीने काम करु.

- Advertisement -

यावेळी बोलताना त्यांनी खासदार संभाजीराजेंवर देखील निशाणा साधला. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.