सोमवारपर्यंत संजय राठोडांचा राजीनामा घ्या, अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर भाजप आक्रमक झाला असून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिलेला आहे. ते म्हणाले कि, ‘जर का उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा सोमवारपर्यंत राजीनामा घेऊन त्यांच्यावर चौकशी नाही सुरु झाली तर सभागृहातील कामकाज चालू देणार नाही’ असा सज्जड दम चंद्रकांत पाटील यांनी भरलेला आहे.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्रच नव्हे तर प्रबोधनकारांचे नातू आहेत. महिला अत्याचारांवर ते शांत बसू शकत नाहीत, ते सत्यवचनी आहेत, असं म्हटलं जातं, पण व्यवहारात ते दिसत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

गेल्या काही महिन्यात मंत्र्यांशी संबंधित अनेक गुन्हे दाखल होत आहेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात काहीच भूमिका घेत नाहीत. आता पूजा चव्हाण प्रकरणात जर मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेऊन संजय राठोड यांची हकालपट्टी केली नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला, अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही, अशी आक्रमक भमिका पाटील यांनी घेतली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like