शिवसेना यूपीए मध्ये जाईल का?? चंद्रकांत पाटील म्हणतात….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना जर कॉंग्रेसप्रणित यूपीए मध्ये गेली तर आश्चर्य वाटणार नाही असे विधान त्यांनी केलं.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची काँग्रेससोबतीच जवळीक पाहता युपीएत जातील का? असा प्रश्न केला, यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, ज्या प्रकारे शिवसेनेचा प्रवास चालला आहे. त्याने ते युपीएमध्ये आल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

शिवसेना – काँग्रेस जवळीक वाढली

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची काँग्रेससोबत जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली. तसंच राहुल गांधी यांनी शिवसेनेची जडणघडण आणि कार्यपद्धतीबाबत जाणून घेतल्याचंही संजय राऊत म्हणाले होते.

Leave a Comment