Monday, February 6, 2023

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे. आपली प्रकृती स्थिर असून काळजी करू नये, असं त्यांनी म्हटलं असून तसं ट्विटच त्यांनी केलं आहे. यापूर्वी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची सुरुवातीची लक्षण जाणवल्याने मी टेस्ट करून घेतली. त्यात माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. माझी तब्येत चांगली आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्याने मी होम आयसोलेशनमध्ये असून डॉक्टरांच्या सर्व सूचनांचं पालन करत आहेत. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची टेस्ट करून घ्यावी आणि स्वत:ला क्वॉरंटाईन करून घ्यावं, असं नड्डा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नड्डा यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांचा मुंबईत 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दौरा होता. पण त्यांनी हा दौराही पुढे ढकलला आहे. या दौऱ्यात ते आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार होते. नड्डा हे ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी हैदराबादेत तळ ठोकून होते. त्यानंतर ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरही गेले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’