Sunday, February 5, 2023

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का? चित्रा वाघ यांचा खोचक सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून महापुराचा धोका निर्माण झाला आहे. अनेक गावे ही पाण्याखाली गेली आहेत तर काही नागरिकांचा संपर्क तुटला आहे. याच एकूण भीषण परिस्थितीवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरवला गेले होते. त्यावरून चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का…… मुख्यमंत्री महोदय आता खरी गरज आहे तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची, असं ट्विट करुन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

 

दरम्यान, राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी आली असून अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू आहे. कोल्हापूरात पंचगंगा नदीचे पाणी शहरात शिरायला लागले असून सांगलीत कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर महाड येथे दरड कोसळून तब्बल 72 जण बेपत्ता असल्याचे समजत आहे. युद्धपातळीवर काम सुरू असून लोकांचं स्थलांतर करणे सुरू आहे