अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका; चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर निशाणा??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण तसंच माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांचं नावही चर्चेत होतं. पण रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

You might also like