Pooja Chavan Case | पुणे पोलिस रक्षक नाहीत तर भक्षक; चित्रा वाघ वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल

पुणे | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून कोणतीच कारवाई का झालेली नाही असा प्रश्न उपस्थित करत पुणे पोलिसांचे वागणे संशयास्पद असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच हे पोलिस रक्षक नाहीत तर भक्षक असल्याचा सणसणीत आरोपही वाघ यांनी केला आहे. आज वाघ या वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आम्हाला आदेश नाहीत, आम्हाला आदेश आल्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही असं पोलिसांनी आपल्याला सांगितलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना विचारुन घ्यावं की ते नक्की कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे. तसेच पुणे पोलिसांकडून तपास काढून घेतला पाहिजे अशी मागणी करत वाघ यांनी पुजा आत्महत्या प्रकरणाचा तपास सिनिअर आय.पी.एस. अधिकार्‍याकडे सोपवावा असं मत मांडले आहे.

पुजा चव्हाण ही महाराष्ट्राची लेक आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असं वाघ म्हणाल्या. वानवडी पोलिस स्टेशनमधील सिनियर पी.आय. लगड यांचे वागणे संशयास्पद आहे. सिनिअरय पीआय अतिशय बेजबाबदार आहेत असा आरोपही वाघ यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like