या बलात्काऱ्याला हाकलून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला..; चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला… या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच राजीनामा घेईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही तोपर्यंत लढत राहणार, आणि बोलतच राहणार”, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

साहेब हे सगळे एकजात सारखेच आहेत. आम्हाला फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही ना?, असं प्रश्न करत आम्ही तुम्हाला ओळखतो. तुमची वेगळी छबी आहे. तुमचं व्यक्तीमत्व सगळ्यांच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्ही कारवाई कराल. या बलात्काऱ्याला हाकलून लावाल. याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराल. आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे”, अस चित्रा वाघ म्हणाल्या.

साहेब तुमच्यावर प्रेशर नाही ना? धनंजय मुंडेंना सोडलं, आता राठोडला सोडण्यासाठी दबाव तर नाही ना. साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का हो? की या खुर्चीपुढे बाईची इज्जत नाही. आपण शिवयारायांचा महाराष्ट्र म्हणता ना मग आता तो कृतीतून दाखवायची वेळ आली आहे”, असं आवाहन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like