कोल्हापूरात एक पालकमंत्री तर दुसरा मालकमंत्री अशी अवस्था; भाजपची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात मात्र, सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या ठिकाणी काल केंद्रीय पथक दाखल झाले आहे. त्यांनतर आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर असून ते सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यावेळी शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. “कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री आणि मालकमंत्री अशी अवस्था असून एकाने बैठक घेतली की दुसरा बैठक घेतो,” असे टीकेत म्हंटले आहे.

कोल्हापुरात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या ठिकाणी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाशी बैठक घेत चर्चा करण्यासाठी सकाळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले. भाजपच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे कोल्हापुरात आला तेव्हा आढावा बैठक घेत प्रशासनाला रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना केल्या. मात्र, बैठक घेऊन वीस दिवस झाले तरी कोल्हापुरातील रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. ती अजूनही थांबलेली नाही हे प्रशासनाचे अपयश म्हणावे लागेल काय?

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. पालकमंत्री आणि मालकमंत्री अशी अवस्था जिल्ह्यात पहायला मिळत आहे. एकाने बैठक घेतली कि, लगेच दुसरा बैठक घेतो, अशी टीका भाजपच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली. तर यावेळी डॉ. टोपे यांना एक प्रकारे इशाराही शिष्टदलाने दिला आहे. तो म्हणजे कोल्हापुर जिल्ह्यात कोरोना परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर सर्व प्रकारच्या उपाययोजना कराव्यात अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने डॉ. टोपेंना दिला.

Leave a Comment