ठाकरे सरकार हे लबाड सरकार, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांच्या प्रचारसभे दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकार हे लबाड सरकार असून या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या अशा शब्दांत फडणवीसांनी हल्लाबोल केला.

जेव्हा हे सरकार सत्तेत आलं तेव्हा या सरकारचं नाव महाविकास आघाडी सरकार अस होत पण आता या सरकारचे नाव महावसुली सरकार झालं आहे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही –

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच उठसूठ लॉकडाऊन केला जात आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like