लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारचा गोंधळ चव्हाट्यावर ; फडणवीसांनी विचारले ‘हे’ ५ सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. यावरून विरोधी पक्ष भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारला काही सवाल केले आहेत. काय सुरू, काय बंद?, कुठे आणि केव्हापर्यंत?, लॉक की अनलॉक?,पत्रपरिषद की प्रेसरिलीज?, अपरिपक्वता की श्रेयवाद?, असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, विजय वडेट्टीवारांनी लॉकडाऊन संदर्भात घोषणा केल्यानंतर त्यांनी परस्पर घोषणा करून टाकली का, मुख्यमंत्र्यांना त्यांनी कल्पनाच दिली नव्हती का, सरकारमध्येच ‘अनलॉक’बाबत एकमत नाही का, ही घोषणा नेमकी कधी आणि कुणी करणं योग्य आहे, की हा श्रेयवादाचा विषय आहे, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment