कितीही स्ट्रॅटेजी करा, येणार तर मोदीच; पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रशांत किशोर- शरद पवार भेटीत देशातील राजकीय विषयावर खोलवर चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारल असता त्यांनी यावर खिल्ली उडवत कोणी कितीही स्ट्रॅटेजी केली तरी येणार तर मोदीच अस म्हंटल आहे.

फडणवीस म्हणाले, कोणी कोणाची भेट घ्यावी, यावर कुठलही बंधन नाही. विरोधी पक्षाचे लोकं असू द्या, किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते असू द्या. प्रत्येकजण आप-आपली स्ट्रॅटेजी तयार करत असतात. कोणी कितीही स्ट्रॅटेजीस् तयार केल्या तरी आजही मोदीच आहेत आणि 2024 लाही मोदीच राहणार आहेत. 2024 च्या निवडणुकांतही मोदींच्या नेतृत्वातच भाजपाचं सरकार येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीत 2024 च्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. तब्बल साडेतीन तास ही बैठक झाल्याने राजकीय तर्क वितर्काना उधाण आले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment