बंडातात्यांना अटक करून सरकारने काय साधलं? फडणवीसांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधल असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

बंडातात्यांचा अटकेनंतर फडणवीसांनी निषेध व्यक्त केला आहे. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?  काहीच मध्यम मार्ग नव्हता? अस म्हणत हा वारकऱ्यांचा अपमान आहे असं फडणवीसांनी म्हंटल. तसेच वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान तत्पूर्वी भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही सरकारवर सडकून टीका केली. ठाकरे सरकार हे मुघलांपेक्षाही अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? असा सवाल त्यांनी केला होता.

Leave a Comment