हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने भाजप राज्य शासनाची पोलखोल करत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेउन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी बोचरे वार करत येणाऱ्या काळातला भाजपचा इरादा स्पष्ट केला.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप खालीलप्रमाणे-
1) उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही.
2) मुख्यमंत्रिपदाबाबत न दिलेलं वचन लक्षात आहे, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन लक्षात नाही? शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय?
3) हिंदुत्वाला धोतर म्हणताय? कसलं तुमचं हिंदुत्व? तुम्ही तर हिंदुत्व कधीच सोडलंय
4) कंगना रनौतच्या कार्यालयावर केलेली कारवाई चुकीची असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? गृहमंत्र्यांवर कारवाई करणार की मुख्यमंत्री स्वत: माफी मागणार?
5) पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालावरुन राज्यात सत्तेचा दुरुपयोग, शासकिय यंत्रणेचा मर्जीप्रमाणे वापर होत असल्याचं सिद्ध
6) मुख्यमंत्र्यांची मुलाखत न्यायालयाच्या निर्णयाच्या एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता.
7) मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली पण त्यात फक्त धमक्या होत्या. सरकारची अॅचिव्हमेंट काय, व्हिजन काय?
8) हात धुवून मागे लागू, ही कोणती भाषा? मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण तसं दिसत नाही. मुख्यमंत्र्यांची मुलाखतीतली भाषा म्हणजे नाक्यावरचं भांडण
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’