कंगनाला सोडा कोरोनाकडं लक्ष द्या! फडणवीसांचा ठाकरे सरकाराला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्र सरकारला आता असं वाटतंय की करोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचं आहे असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. अख्खं सरकारी तंत्र कंगनाशी लढण्यासाठी उतरलं आहे. आता कोरोनाशी लढणं संपलं असून कंगनाशी लढाई सुरु आहे. या प्रकरणात जी काही चौकशी करायची ती करावी. कंगनानंही तसं सांगितलं आहे. मात्र कुठंतरी गांभीर्यानं कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.

“जेवढ्या तप्तरतेने कंगनाची चौकशी करु, हे करु ते करु म्हणत आहात, त्यापेक्षा जास्त लक्ष कोरोनाकडे द्यायची गरज आहे. त्यापेक्षा 50 टक्के तरी क्षमता कोरोनावर खर्च करा, कदाचित त्यानं लोकांचा जीव वाचवण्यात मदत मिळेल” असं फडणवीस म्हणाले. “महाराष्ट्रात रोज करोनाचा आकडा वाढत आहे. देशातील ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. पण करोनासोबत लढायचं सोडून सरकार कंगनाशी लढत आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“कंगनाचा मुद्दा भाजपाने उचललेला नाही. तुम्ही कशाला कंगनाविरोधात बोलायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर जाईल इतकं महत्त्व कशाला दिलं. तुम्ही जाऊन तिचं घर तोडलं,” असं सांगत फडणवीसांनी कंगना भाजपाच्या संपर्कात असल्याचा आरोप फेटाळला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment