शरद पवारांनी मेट्रोबाबतचा अहवाल वाचावा, ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेट्रो कारशेड वरून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. कांजूरमार्ग येथील कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. “शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटतील. या मुद्द्यावर पवार मोदींशी चर्चा करतील,” अशी माहिती मलिक यांनी दिली. तसेच, मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही प्रयत्न करत आहेत. या सर्वांत शरद पवार मद्यस्थी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी मेट्रोबाबत अहवाल वाचावा. शरद पवारांशी आमचे कितीही मतभेद असले तरी पवारसाहेब अहवाल वाचतील आणि प्रॅक्टिकल निर्णय घेतील. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, “आरे येथे कारशेड उभारण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. आरे येथे कारशेड उभाल्यानंतर एक इंचही जास्त जागा तिथे लागणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरेत कारशेड उभारण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आम्हीसुद्धा सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत,” अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. तसेच या प्रकल्पासी आम्ही भावनिक दृष्टिकोनातून जोडले गेलेलो आहोत. त्यात मेट्रोचे काम 80 टक्के पूर्ण झालेले आहे. आरे येथे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा प्रोजेक्ट अडचणीत आणण्यासारखं होईल,” असे फडणवीस म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment