महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? फडणवीसांचा काँग्रेस – राष्ट्रवादीला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. आज मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रमुख उपस्थिती लावली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन एवढे दिवस झाले, कुठलही आंदोलन महाराष्ट्रात झालं नाही. आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकऱ्यांन भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. आता जी लोकं या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्त मंचावर जात आहेत किंवा जी लोकं या मोर्चाला मदत करत आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे, काँग्रेसने आपल्या २०१९ च्या जाहीरनाम्यामध्ये बाजार समिती रद्द करा आणि आम्ही निवडून आलो तर आम्ही बाजार समिती रद्द करून टाकू, असं का म्हटलं होतं? याचं उत्तर दिलं पाहिजे.”

फडणवीस पुढे म्हणाले, २००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला. २००६ पासून २०२० पर्यंत तो महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रतला कायदा चालतो आणि देशातील कायदा का चालत नाही? ही ढोंगबाजी का? याचं उत्तर काँग्रेस-राष्ट्रवादीने याचं उत्तर दिलं पाहिजे.” असा देखील प्रश्न फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला यावेळी विचारला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment