भाजप जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांना तात्काळ अटक करा : राष्ट्रवादीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी मागासवर्गीय समाजातील मयत व्यक्ती पिराजी भिसे यांची खोटी कागदगपत्रे बनवून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला. या गुन्ह्याची सखोल चौकशी करून आमदार जयकुमार गोरे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी पार्टीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महेश तपासे पुढे म्हणाले, आज आम्ही सातारा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंन्सल यांच्याकडे आम्ही मागणी करण्यासाठी आलो आहोत. माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना बेड्या घालाव्यात अशी, मागणी करणार आहोत. माझ्या आजोबांनी माण- फलटण तालुक्याचे नेतृत्व केले. लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्षांकडे तसेच राज्यपालांकडे आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार आहोत. महाविकास आघाडी सरकार कायदेशीर कारवाईची मागणी आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून करत आहोत.

दहिवडी येथे विविध मागासवर्गीय संघटनांनी मोर्चा काढला. सदरची घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. आ. जयकुमार गोरे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे गंभीर प्रकारचा असल्याची श्री. तपासे यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस महाराष्ट्र कार्याध्यक्ष रवि वरपे, गोरखनाथ नारकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment