व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ज्या पायऱ्यांवर सोमय्यांना धक्काबुक्की त्याच पायऱ्यांवर भाजप कडून सत्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायरीवर भाजप नेते किरीट सोमय्या याना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपाच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेबाहेर भाजप समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गर्दी अनावर झाल्याने पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे.

यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्या आहेत. त्यांनी कोविड कंपनी कोणाची आहे हे सांगावं असे म्हणत पुण्यातील जम्बो कोविड सेंटर मध्ये घोटाळा असे किरीट सोमय्या यांनी म्हंटल

पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत ४ ठेके दिले असा आरोप सोमय्या यांनी केला