आमची ईडी लागली, आता सीडी दाखवा; महाजनांचे एकनाथ खडसेंना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या मागे ईडी लावाल तर मी देखील सीडी लावेन अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करताना म्हंटल होत. पण सध्या एकनाथ खडसे हे ईडीच्या रडारावर असून आता आमची इडी मागे लागली आहे आता खडसेंनी सीडी लावावी अस जाहीर आव्हान भाजप आमदार गिरीश महाजन यांनी दिले आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, ईडी अन् सीडीचा विषय आता बोअर झाला आहे, आमची ईडी तर चालली आहे, तुमची सीडी तर दाखवा. सीडी बाहेर येईल का नाही ते नेत्यांनाच विचारा? ते म्हणताहेत चौकशी करताहेत, तपासताहेत त्यामुळे आता समजेल योग्य वेळ कोणाची येते ते? अशा शब्दांत महाजन यांनी खडसेंचे नाव न घेता टोला लगावला.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत असून त्यांचा वीज पुरवठा खंडित करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे महावितरणाच्या कारभाराविरुद्ध एखादं आंदोलन उभारावं लागणार असल्याचं महाजन म्हणाले. त्यासोबतच एकीकडे सर्व उघडं असताना दुसरीकडे मंदिर बंद ठेवणं योग्य नसल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment