…तर मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी आणि रस्त्यावर उतरावं ; पडळकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. दरम्यान यावर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. जर जनतेने जबाबदारी घ्यायची असेल तर सरकार काय करत असा सवाल करत जनतेला दरवेळी रस्त्यावर उतरवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी आणि रस्त्यावर उतरावं अस गोपीचंद पडळकर यांनी म्हंटल.

पडळकर म्हणाले, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची, दहशत निर्माण करायच सरकारने बंद करावे. इथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि सरकार लॉकडाउनचा खेळ लावतय. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या बाबतीत तुम्ही काय केले. तुम्हाला कोरोनाला रोखता आले नाही. हे सरकारने स्पष्टपणे कबूल करायला पाहिजे

लॉकडाउन हा पर्याय नाही. लॉकडाउन शिवाय देखील कोरोनाला नियंत्रणात आनता येत.परंतु दरवेळी जनतेला गृहीत धरून आपले मनमानी निर्णय रेटायचे बंद करावे. प्रत्येक गोष्टीला जनतेने जबाबदारीने वागायचं तर मग सरकार नक्की काय करत आहे असा सवाल त्यांनी केला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like