रोहित पवार शरद पवारांचं सुधारित व्हर्जन, त्यांना मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत; पडळकरांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पवार कुटुंबियांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आता आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय. रोहित पवार हे शरद पवार यांचं सुधारित व्हर्जन आहे. गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल, अशा शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवलाय.

आमदार झाल्यापासून रोहित पवारांना मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. ते स्वतःला स्वयंघोषित मुख्यमंत्री समजतात. त्यांना उठसूट केंद्र सरकार दिसत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उंची मोजण्याआधी स्थानिकांचे प्रश्न सोडवतेत असेही पडळकर यांनी म्हंटल.

बहुजनांच्या, उपेक्षितांच्या गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल,’ असा प्रहार पडळकर यांनी केलाय. तुम्हाला हे गोंडस बाळ दिसत असेल पण पुन्हा त्याला हातभार मिशा आल्यावर तुम्ही म्हणाल अरे हे असं कसं घडलं ? तेव्हा बहुजनांच्या पोरांनी यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे असा टोला देखील त्यांनी लगावला.

Leave a Comment