हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण; 2 दिवसांपूर्वीच मुलीचा लग्नसोहळा पार पडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. मंत्रिमंडळातील नेत्यांनंतर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच लग्न झालं होतं.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती,” असं त्यांनी ट्वीट हर्षवर्धन पाटील यांनी केलं.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठया प्रमाणात भर पडली आहे. त्यातच राजकीय नेत्यांनाही कोरोनाची बाधा होत असताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, प्राजक्त तनपुरे, यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि आता हर्षवर्धन पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment