हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार – केशव उपाध्ये यांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर घणाघात केला आहे. एकामागून अनेक ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली.

उपाध्ये म्हणाले, “न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर थपडा मिळत आहेत. तसेच जनतेला राज्यातील आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पहात असतां हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे”.

न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ती मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती वाढतच आहे. कालच विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. अन्य एक मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशी ठरविण्याचा काल आलेला निर्णय ताजा आहे.

एकीकडे कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र फक्त थापा हे सरकार देत आहे. भरमसाठ वीजबिलात वारेमाप सवलत देण्याच्या थापा, शेतकऱ्यांना मदतीच्या थापा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू ही एक थाप, पीक वीमा कंपन्याच्या अटी शेतकऱी धार्जिण्या करू, मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा अनेक थापा सरकार जनतेला देत असून याची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार हीच झाली आहे, अशा तिखट शब्दांत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment