Saturday, June 3, 2023

सगळ केंद्राने द्याव, मी फक्त घरात बसणार; भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई लोकल प्रवासासाठी काही सूट देण्यात आली असून स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपला परिसर, आपलं गाव, शहर, जिल्हा हे कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या संवादावरून भाजपने टीका केली आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागून एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सगळ केंद्राने कराव आणि केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार आणि सरकारमधून ठेकेदारांची बिल काढणार- हेच धोरण अस केशव उपाध्ये यांनी म्हंटल.

भाजपाच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लशीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही?

सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर! असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले.