काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू; भाजपचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. केंद्र सरकारकडून डेटा दिला जात नसल्याचा सरकारमधील काँग्रेस नेत्यांकडून केला जात असून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर प्रत्युत्तर देत काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावलं आहेत.

केशव उपाध्ये यांनी म्हंटल की, काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू आहेत. विजय वडेट्टीवार हे केंद्राकडे बोट दाखवतात, तर सचिन सावंत हे काही पत्राकडे बोट दाखवतात… अहो, पण एसईसीसीचा डेटा हा ५० टक्क्यांच्या आतल्या आरक्षणासाठी नाही, तर वरचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी ती माहिती मागण्यात आली,” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

पण, 2013 रोजी त्यावेळच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने एक आदेश काढला होता की, ही माहिती राज्यांना देऊ नका. कारण, हा संपूर्ण डेटा चुकीचा आहे. तो राज्यांना दिला तर अनेक गंभीर आणि नवीन प्रश्न निर्माण होतील. अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका. त्याने २ फायदे होतील. १. डोक्यात प्रकाश पडेल २. आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल,” असा सल्ला देत केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं आहे.

आणि अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका. त्याने २ फायदे होतील. १. डोक्यात प्रकाश पडेल २. आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल. youtu.be/RLTXViSxCJI youtu.be/jTLpLKAw5Ag असं केशव उपाध्ये यांनी म्हंटल

Leave a Comment