मंत्रालय कोणाच्या बापाची मालकी नाही, हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा नगरविकास खात्याला भेट देऊन फायली चाळल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर सरकारने सोमय्याना थेट नोटीस बजावली. त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

वित्तमंत्रालय आणि नगरविकास खात्याची सूचना डावलून उद्धव ठाकरे यांनी प्रताप सरनाईक यांच्या दंडमाफीसाठी ज्या फाईलवर सही केली तो कागद मिळवण्यासाठी मी मंत्रालयात गेलो होतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही गुंडगिरी सुरु केली आहे. पण शिवसेनेची ही गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत आहेत. दोष काय तर मी खुर्चीवर बसलो. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहेत. ठाकरे जे खोटे बोलले ती चोरी मी पकडली, त्याचा राग त्या कर्मचाऱ्यांवर ते काढत आहेत. एका गरीब टायपिस्ट लिपीकाला तुम्ही नोटीस देता. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री बघा, असे सोमय्या म्हणाले.

मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही. ठाकरे सरकारने महाराष्ट्राला लुटायचे आणि ते उघडकीस आणले की असे वागायचे. मी पोलीस ठाण्यासह सर्व विभागातील सचिवांना तक्रार दिली आहे. इतकेच नाही तर ज्यांनी मला नोटीस बजावली ते अधिकारी शिंदेंनाही मी विचारले आहे, तुम्ही माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले आहे”, असंही सोमय्या म्हणाले.

Leave a Comment