व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अनिल देशमुखांची रवानगी जेल मध्ये होणार; किरीट सोमय्यांनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा सरकार वर टीका केली आहे. अनिल देशमुख यांनी रवानगी जेल मध्ये होईल असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हंटल आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.

अनिल देशमुखचा घरी आज ED ई डी चे छापे काही दिवसांनी जेल मधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं.

काय आहे प्रकरण –

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडी ने छापमारी सुरू केलीं आहे. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान, अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे.