Wednesday, February 8, 2023

सात अजूबे इस दुनिया में आठवा माननीय मुख्यमंत्री हैं; सुधीर मुनगंटीवारांची घणाघाती टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. आता भाजपचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अजुबा असा उल्लेख करीत टीका केली आहे. “गेल्या दोन वर्षात महराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची देखील नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”, शी टीका मुनगंटीवार वयानी केली आहे.

भाजपचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमास उपस्स्थिती लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “आमदार म्हणू दोन वर्षी केलेली कामे जनतेसमोर ठेवण्यात येत आहे. जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेला आघाडीतील नेत्यांकडूनही जोरदारपणे प्रत्युत्तर दिले जात आहे. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असल्याने त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देणार हे पाहावे लागेल.