महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार खंडणीखोर ; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भाजपकडून महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाईची मदत यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेकडून अनेक ठिकाणी राजकारण केले जात आहे. शिवसेना एक संधीसाधू अशा प्रकारचा पक्ष आहे. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, अशी टीका फडणवीस यांनी केली.

यावेळी फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष हा संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला या ठिकाणी हवे आहेत का? हे सरकार जर या ठिकाणी आले तर नाव महाराष्ट्राचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.”

 

दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजप व महाविकास आघाडी सरकारमधील दिग्गज नेते या ठिकाणी येत आहेत. तसेच एकमेकांवर टीका करीत आहेत. आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीकाही केली आहे.