राज्य सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीचे धोरणच आत्महत्येला जबाबदार; प्रवीण दरेकरांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. नगर जिल्यातील शेवगाव या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली. यावरून भाजप नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचारी वैफल्याने आत्महत्या करत आहेत. राज्य सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीचे धोरणच कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करीत राज्य सरकारवर टीका केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगायचं तर दुसऱ्या बाजूला कर्मचारी वैफल्यानं आत्महत्या करत आहेत. आतातरी सरकार जाग होणार आहे की नाही? जर एसटी कर्मचाऱ्यांच्या अशाच आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार राज्य सरकारचं असेल.

शेवगाव या ठिकाणी दिलीप काकडे नावाच्या एसटी चालकाने एसटी मागे जाऊन आत्महत्या केली आहे. अत्यंत दुर्देवी अशी हि घटना घडली आहे. जर एसटी कर्मचाऱ्यांच्या अशाच आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार राज्य सरकारचं असेल, असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला आहे.

Leave a Comment