Wednesday, February 8, 2023

नवाब मलिकांकडून एनसीबीला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न; प्रवीण दरेकरांची टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबीच्यावतीने काही दिवसांपूर्वी क्रूज ड्रग्ज पार्टीवर धाड टाकण्यात आली. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली. एनसीबीच्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. नवाब मलिकांकडून एनसीबीला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे दरेकर यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दाते म्हणाले की, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. हे जे काही चालले आहे ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चालले आहे. मलिकांकडून एनसीबीला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, एनसीबीच्या वतीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. त्यावरन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे फक्त मुस्लिम समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप केले जात आहे, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.