‘सारथी’ला बंद करून दाखवाच! मग बघतो; नितेश राणेंचा मंत्र्याला धमकीवजा इशारा

0
46
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात भाजप आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. सारथी संस्था बंद केल्यास राज्यातील मंत्र्यांना नव्या गाडीतून महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा धमकीवजा इशारा राणे यांनी दिला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे.

राणे यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे. ‘राज्यातील मंत्रीच जातीजातीत भांडणं लावून अंग काढून घेऊ लागले आहेत. मग हे सरकार काय कामाचे? असा सवाल करतानाच सारथीला बंद करून दाखवाच, मग बघू मंत्री नव्या गाडीतून महाराष्ट्रात कसे फिरतात,’ असा इशारा राणे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात सारथीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सारथी संस्थेच्या मुद्द्यावर खंडाजगी पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

दरम्यान, काल विजय वडेट्टीवार यांनी केवळ ओबीसी नेता असल्यामुळे मला वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असं म्हटलं होतं. सारथी द्वेष्टा असल्याची प्रतिमा निर्माण केली जात आहे. काहींना राजकारण करायचं आहे. माझी बदनामी करायची आहे. सारथीचा द्वेष्टा असल्याची माझी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सारथीबाबत माझी भूमिका दुटप्पी आहे, असं मराठा समाजाला वाटत असेल तर मीच मुख्यमंत्र्यांना भेटून सारथीचं काम एखाद्या मराठा नेत्याकडे देण्याची विनंती करणार आहे. त्यानंतर तुम्हाला हवा तो निर्णय बिनधास्त घ्या, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

खासदार छत्रपती संभाजीराजेंनी वडेट्टीवारांना झापलं
भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी वडेट्टीवार यांना त्यांच्या वक्तव्यावरून झापलं होतं. मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, अशा शब्दात संभाजी राजे यांनी वडट्टीवार यांना फटकारले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करून संभाजी राजे यांनी हे ट्विट केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here