नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?; नार्वेकरांच्या ट्विटवर राणे यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज 6 डिसेंबरचे निमित्त साधून एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन असे लिहले. नार्वेकरांच्या ट्विटवरून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक टोला लगावला आहे. “शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?, असा खोचक सवालही राणे यांनी केला आहे.

भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पुणे येथे डॉ. बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर ‘महापरिनिर्वाण दिवस’ कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का? असा सवाल राणे यांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जहरी टीका करून वातावरण तापवले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री राणे हे आता पुन्हा आक्रमक झाले आहेत.

ट्विटमध्ये नार्वेकर यांनी काय म्हंटले आहे?

मिलिंद नार्वेकर यांनी आज 6 डिसेंबरचे निमित्त साधून एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत बाबरी मशीद पाडण्यासाठी जमाव मशिदीवर चढत असल्याचे दिसते आहे. त्या फोटोवर एक ओळ लिहिलेली आहे. त्यात असे म्हटले आहे की, अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन…असे नार्वेकर यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment