अगोदर भारतीय घटना वाचावी, जबाबदार व्यक्तीने असे बोलू नये; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी तुझी मर्जी म्हणजे हा तुझा अधिकार नाही. अधिकार हा वेगळा असतो आणि मर्जी ही वेगळी असती. हे कुणीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे, असे म्हंटले होते. त्यांच्या या विधानावरून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी अगोदर भारतीय घटना वाचावी, जबाबदार व्यक्तीने असे बोलू नये, असे राणेंनी म्हंटले आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काही कायद्याच्या दृष्टीने विधाने केली. त्यांना माझे एवढेच सांगणे आहे की, मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी. मुख्यमंत्री यांनी कर्तव्य काय हे त्यांनी आधी समजून घ्यावी. आपण राज्याचे एक जबाबदार व्यक्ती आहात. आपण असे बोलू नये.

सध्या महाराष्ट्रात दारू, मटका जुगार याला बंदी आहे. अडीच वर्षे झाली यांना एबीसीडी कळलेली नाही. कायद्यात नसतात त्या गोष्टी ठाकरे सरकार बोलत आहे. संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली आहे. केंद्रीयमंत्री अमित शहा किमान काश्मीरला तरी जातात संजय राऊतांनी जाऊन तरी दाखवावे, असा टोला यावेळी राणेंनी लगावला.

Leave a Comment