कोकणात अजूनही काही भागात नाचे आहेत, त्यातला प्रकार विधानसभेत झाला; नारायण राणेंची जाधवांवर जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्कल केली. यावरून अधिवेशनात विरोधक भाजप नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. जाधव यांच्या या प्रकारावरून आता भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांच्या नक्कलीला नक्कलीतून उत्तर दिले जाईल. कोकणात काही भागात नाचे आहेत, ते होळीच्या दिवशी पैसे दिले की नाचतात, त्यातला तो प्रकार त्या दिवशी विधानसभेत झाला, अशी टीका राणे यांनी केली.

भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. कोण अजित पवार त्यांना मी ओळखत नाही? असा सवाल करीत राणेंनी थेट पवारांवरही निशाणा साधला. तसेच जाधवांनी कोकणाप्रमाणे विधानसभेतही नक्कल केली आहे. कोकणात काही भागात नाचे आहेत, ते होळीच्या दिवशी पैसे दिले की नाचतात. आणि अशाच प्रकार त्या दिवशी विधानसभेत जाधव यांनी केला, अशी टीका राणे यांनी केली आहे.

अगोदर म्याव म्याव आणि आता नक्कलीवरून कोकणातील राजकारण तापले असल्याने राणे विरुद्ध भास्कर जाधव असा वाद आता रंगू लागला आहे. दरम्यान मंत्री राणेंनी आज भास्कर जाधव यांना नाच्याची उपमा दिली असल्याने आता चांगलाच संघर्ष पेटणार हे नक्की.

Leave a Comment