Wednesday, February 8, 2023

मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला तिलांजली; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. त्यांच्या मेळाव्यांना नंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलीत. आता तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद होय,” अशी टीका राणेंनी केली आहे.

मंत्री राणेंनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्यावर निशाणा साधला आहे. “मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सांगितले. की किती हा ठाकरेंचा बोगसपणा? किती खोटारडेपणा?? किती ही बनवाबनवी? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मुख्यमंत्री पद.

- Advertisement -

मुख्यमंत्री पदाच्या आदर्शाबाबत सांगायचे झाले तर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा आदर्श आत्मसात करून काम करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा ठेवता येत नाही. सध्या संजय राऊत नैराश्यामध्ये आहेत. त्या अवस्थेमधूनच ते उद्धव यांना सर्वांपेक्षा वरचढ दाखवायचे आणि नसलेले गुण त्यांच्या अंगी चिकटवून त्यांना कर्तबगार दाखवायचे असे राणे यांनी म्हंटले आहे.