मंदिरात पूजा करणार्‍या भाजप नेत्याला केरळ मध्ये अटक; लाॅकडाऊनच्या उल्लंघनाचा ठपका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन लागू केलेला आहे तसेच सरकारने सर्व प्रकारच्या सभांनादेखील बंदी घातलेली आहे. दरम्यान, केरळमधील सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते आणि मंदिरप्रमुखांसह पाच जणांना नुकतेच अटक करण्यात आली आहे. मंदिरातील धार्मिक विधीवेळी मंदिर प्रमुखांनी जमाव गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एरुमापट्टी पोलिसांनी शुक्रवारी इरुमापट्टी येथील पाझीओतमुरी येथे भागवत सप्ताह आयोजित करताना लॉकडाउनच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपच्या प्रदेश इकाईचे नेते ई. चंद्रन, गोपी, सुदानन, नारायणन आणि रामन यांना शुक्रवारी अटक केली. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इरुमापट्टी येथील नरसिंह मंदिरात शुक्रवारी सकाळी सुमारे १०० लोक भागवत कथा पठण करीत होते.

पोलिसांनी सांगितले की, मंदिरात भगवत कथा चालू होती. दरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आणि इतर काहीजण हे पळून गेले.ते म्हणाले की अटक केलेल्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही मंदिर बंद झाले नव्हते तसेच लोक दररोज प्रार्थना करण्यासाठी मंदिरात येतच होते.

केरळमध्ये शुक्रवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे फक्त एकच प्रकरण समोर आले आणि त्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन म्हणाले की कोविड -१९ च्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये सध्या संसर्ग झालेल्या १६ लोकांवर उपचार सुरू आहेत. विजयन पुढे म्हणाले की, राज्यात संसर्ग पुन्हा सुरू न होऊ देण्यासाठी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment