मलिक म्हणजे गटारगंगा, खरे तर गटारच; अतुल भातखळकरांची नवाब मलिकांवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर अत्यंत अपशब्दात टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना खासदार सन्जय राऊत यांच्यावर निशाणा साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली. मलिक म्हणजे रोज वाहणाऱ्या गटारगंगा आहेत. त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या विधानांना काहीही किंमत नाही, अशा शब्दात भातखळकर यांनी टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील नेत्यांवर सध्या भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. सरम्यान आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे दररोज काहींना काही विधाने करीत असतात. त्यांच्याबरोबर राऊतही बोल्ट असतात. मक्लिक मलिक म्हणजे रोज वाहणाऱ्या गटार गंगेप्रमाणे आहेत. त्यांच्याजकडून केल्या जात असलेल्या विधानांना कवडीचीही किंमत नाही, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षातील नेत्यांवर केल्या जात असलेल्या टीकेला शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते काय प्रत्युत्तर देणार हे पहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पडळकरांना प्रत्युत्तर देण्यात आले होते.