14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून टीकास्त्र डागले जात आहे. आज केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टीका करण्यात आल्यानंतर भाजप नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “कोरोनाच्या काळात सर्व बंद होते. या काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? मात्र, तरीही त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री कसे म्हणता? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

भाजप नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणाणारा सर्व्हे कुणी केला माहिती नाही. ते १४ महिने मंत्रालयात आलेले नाही मात्र, याउलट देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी विकासाची कामे केली, त्यामुळे राज्यातील 12 कोटी जनतेला विचारा, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण आहे? असाही सवाल बावनकुळेंनी केला आहे.

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उत्कृष्ट मुख्यमंत्रीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सोबत टोलाही लगावलेला आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या या टीकेला शिवसेनेतील नेते कशा प्रकारे पलटवार करतात. हे पहावे लागेल.

Leave a Comment