हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंगचे संकट उभे राहिले आहे. त्यावरून भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. या सरकारमध्ये शेतकऱ्यांसह अनेक प्रश्न सोडवण्याची धमक नाही. हे सरकार रडीचा डाव खेळत आहे. तो बंद करावा, अशी टीकाही बाणवकुळेनी केली आहे.
राज्यावर वीज निर्मितीचे संकट असले तरी लोडशेडिंगची वेळ येऊ देणार नाही”, असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला. त्यावरून बावनकुळेंनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, राज्यावर लवकरच लोडशेडिंगची परिस्थिती निर्माण होणार आहे. आजही राज्यातील शेतकरी रात्री अंधारात राहतोय. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री यांनी शेतकऱयांवर अंधारात राहण्याची वेळ येऊ देऊ नये. मुख्यमंत्र्यानी लवकरात लवकर ३२ लाख टन कोळसा राज्यात वितरित केला पाहिजे. आणि राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.
माजी ऊर्जा मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद https://t.co/o0vlx5FBn8
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 12, 2021
राज्यावर थकीत कर्जाचा बोजा आहे. अजूनही वीजनिर्मिती, कोळसा निर्मिती कंपन्यांना त्यांनी पैसे दिलेले माहिती. काहींचे पैसे थकीत ठेवले असल्याने पुन्हा राज्य अंधारात नेण्याची वेळ या सरकारने आणली आहे. या सरकारच्या तिन्हीही कंपन्यांमध्ये कुठलाही ताळमेळ नाही. या सरकारचे प्रशासनावरील नियंत्रण गेल्यामुळे आज लोडशेडिंगची वेळ आली असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला आहे.