भाजपला बदनाम तर ओबीसींचा फुटबॉल केला जातोय; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाबाबत दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात बारामतीमधूनओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस व राज्य सरकारवर टीका केली. माझ्यावर सरकार पाडण्याचे आरोप करून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे तर या राज्य सरकारच्याच मनात ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही म्हणून ओबीसींचा फुटबॉल केला जातोय, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

भाजपनेते भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्य सरकावर टीका केली आहे. त्याचबरोबर बावनकुळे यांनी भाजपला कशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातआहे. या मागचे कारणही सांगितले. यावेळी त्यांनी राजकारण न करता भाजपचे नेते सरकारच्या मदतीला तयार आहेत, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे म्हणाले की, ओबीसी आयोग तयार झाला आहे. डेटा तयार करायला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण थांबवलं नाही, केवळ डेटा तयार करण्याची सूचना केलीय. पण ओबीसींना आरक्षण द्यायचं मनात नसेल म्हणून ओबीसींचा फुटबॉल केला जातोय. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्यावर आरोप केला. पण आमच्या कोणत्याही आमदाराने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नसून जाणीवपूर्वक अफवा निर्माण करून मला आणि भाजपला बदनाम करण्याचे काम केले जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Leave a Comment