देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार ; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 ची विधानसभा निवडणूक कोल्हापूर सोडून पुण्यातून लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांना विरोधकांकडून कायम लक्ष्य केले जाते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आता आपण पुणे सोडून कोल्हापूरात परतणार असल्याचे मोठं विधान केले आहे. पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, पुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळची विधानसभा निवडणूक कोल्हापूरऐवजी पुण्याच्या कोथरुडमधून लढविली होती. यावेळी त्यांनी सेफ मतदारसंघ निवडल्याचे आरोप झाले. तसेच निवडणुकीवेळी परका उमेदवार दिला, भाजपाला पुणेकर भेटला नाही का असाही प्रचार केला गेला. या निवडणुकीत पाटील विजयी झाले असले तरीही त्यांच्यामागे परक्याचा शिक्का कायमचा लागला आहे. यावर पाटील यांनी मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे वक्तव्य देखील केले होते.

चंद्रकांत पाटलांचे डिपॉझिट जप्त करू – राष्ट्रवादी

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरातून निवडणूक लढवण्याच्या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर किंवा कोल्हापुरमधून निवडणूक लढवूनच दाखवावी. आम्ही त्यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment