मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का?? ; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदल परिसरात आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. विरोधकांकडून या प्रकाराबद्दल शंका व्यक्त करण्यात आली असून भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला सवाल केला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून विचारला आहे.

मुंबई पोलीस सक्षम – संजय राऊत

दरम्यान, ही घटना दुर्देवी आहे. पण एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे असेही राऊत म्हणाले. हिरेन यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. ही शंका दूर झाली पाहिजे. पण त्यांच्या मृत्यूचं कुणीही भांडवल करू नये, असा टोला राऊत यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment