‘खाण्याची’ एवढी सवय लागलीय की सरकारने गरिबांच्या ताटातला घास सुद्धा सोडला नाही; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील गरीब जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शिवभोजन थाळी योजनेत मोठा भ्रष्टाचारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरुन सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेते पैसे लाटले आहे. महाविकास आघाडी सरकारला ‘खाण्याची’ एवढी सवय लागलीय की गरिबांच्या ताटातला घास सुद्धा सोडलेला नाही. हे भोजन माफिया कोण आहेत. त्यांना कोणते मंत्री पाठीशी घालत आहेत. हे समोर यायलाच पाहिजे, असे वाघ यांनी म्हंटले आहे.

शिवभोजन थाळीवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर ट्विट करीत निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ग्राहकांचा फोटो एकच पण नावे वेगवेगळी टाकून शिवभोजन थाळी योजनेतील अनुदान दलालांनी लाटले आहे. या माध्यमातून सरकारने आपल्या बगलबच्चांची सोय केली आहे. लहानग्यांना उपाशी ठेवण्याचं पाप केले आहे. गरीबांच्या हक्काचे भोजन दलालांच्या घशात कसे गेले, याची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत सखोल चौकशी होणे गरजेची आहे.

महाविकास आघाडी सरकारला ‘खाण्याची’ एवढी सवय लागलीय की गरिबांच्या ताटातला घास सुद्धा सोडला नाही. हे भोजन माफिया कोण आहेत. त्यांना कोणते मंत्री पाठीशी घालत आहेत. हे समोर यायलाच पाहीजे, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान उद्यापासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला मुंबईत सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

Leave a Comment